लंडन : (marriage proposal) कधी कधी भलतेच अनवस्था प्रसंग निर्माण होत असतात. अशा वेळी प्रसंगावधान राखूनच असे प्रसंग 'साजरे' करावे लागतात. एका तरुणाबाबत असेच घडले. एका छोट्या बोटीच्या डेकवर उभे राहून तो आपल्या प्रेयसीला प्रपोज करीत असताना अचानक अंगठी असलेली डबी त्याच्या हातातून निसटून समुद्राच्या पाण्यात पडली. त्यानंतर जे घडले ते कॅमेर्यात टिपले गेले आणि ते पाहून आता लोकांचे मनोरंजन होत आहे!
या तरुणाने समुद्रात एका सुंदर बोटीवर उभे राहून आपल्या प्रेयसीसमोर (marriage proposal) लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने जय्यत तयारीही केली होती. त्याचे व तिचे मित्र-मैत्रिणीही हजर होते व ते दोघांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेला कॅमेर्यात टिपूनही घेत होते. या दोघांनी आधी 'टायटॅनिक'मधील त्या प्रसिद्ध पोजची नक्कल केली.
त्यानंतर तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून प्रपोज(marriage proposal) करण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्याच्या हातातून अंगठीची डबी खाली पडली व घरंगळून पाण्यात गेली. ती खोल पाण्यात जाण्यापूर्वीच त्याने तत्काळ पाण्यात उडी मारून ही डबी अलगद पकडली व बोटीवर उभ्या असलेल्या मित्राकडे दिली. त्याची ही तारांबळ पाहून त्याच्या प्रेयसीला व इतरांना हसू अनावर झाले! अखेर पुन्हा बोटीवर येऊन त्याने गुडघ्यावर बसून तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि एकदाचे तिच्या बोटामध्ये ही अंगठी घातली!
हेही वाचा :