भारतातील नदी : झारखंडमध्ये वाहते नदीच्या पाण्यातून सोने! | पुढारी

भारतातील नदी : झारखंडमध्ये वाहते नदीच्या पाण्यातून सोने!

नवी दिल्ली : भारतात अनेक नद्या आहेत. प्रत्येक नदीचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे. गंगा नदीला भारतात सर्वात पवित्र असे मानले जाते. मात्र, आपल्याच देशात अशी एक नदी आहे की, त्यामधून गेल्या अनेक शतकांपासून पाण्यासोबत सोनेही वाहत आहे. यावर विश्‍वास बसत नसला तरी ते अगदी सत्य आहे.

झारखंडमधील स्वर्णरेखा नदीलाच सोन्याची नदी असे म्हटले जाते. या नदीच्या वाळूत, मातीत सोन्याचे कण आढळतात. मात्र, सोन्याचे हे कण नेमके कोठून येतात, याचे उत्तर शास्त्रज्ञांनाही मिळालेले नाही. भू-शास्त्रज्ञांच्या मते, स्वर्णरेखा ही नदी अनेक पर्वत व लहान-मोठ्या टेकड्यांमधून वाहत आहे. पाण्याच्या घर्षणामुळे वाहत येते. ही नदी झारखंड, पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागातून वाहत जाते. मात्र, काही भागातच या नदीला ‘स्वर्णरेखा’ या नावाने ओळखले जाते. नदीचा उगम रांचीपासून 16 कि.मी. अंतरावर होतो. तर नदीची लांबी एकूण 474 कि.मी. इतकी आहे.

स्वर्णरेखाची एक उपनदीही असून तिचे नाव ‘करकरी’ असे आहे. या उपनदीच्या रेतीतही सोन्याचे कण सापडतात. काही लोकांच्या मते, करकरी नदीतून आलेलेच सोन्याचे कण स्वर्णरेखा नदीत आढळतात. या करकरी नदीची लांबी केवळ 37 कि.मी. आहे. या दोन्ही नद्यांमधील रेतीत सापडणारे सोन्याचे कण नेमके कोठून येतात, याचे रहस्य आजपर्यंत कोणालाच उलगडलेले नाही.

संबंधित बातम्या

हेही वाचलत का ?

Back to top button