राज्यभरात पाच हजार ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

राज्यभरात पाच हजार ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन दरात सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर रोजच वाढताहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वाढवायच्या आहेत. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने आणत आहेत. त्यामुळे राज्यभरात 5 हजार ‘चार्जिंग स्टेशन’ सुरू करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निंबूत (ता. बारामती) येथील कार्यक्रमात सांगितले.

पेट्रोल अणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता राज्यातील पेट्रोल पंपांवर सीएनजी सुविधांसह ‘चार्जिंग सेंटर’ उभारणीस प्राधान्य देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

चारचाकी वाहने तयार करणार्‍या बहुतांश कंपन्यांनी गॅस व इलेक्ट्रॉनिक वाहने बनवण्यास प्राधान्य दिले असल्याने भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘चार्जिंग सेंटर’ उभी करावी लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. शिवाय डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक वाहनांची गरज आहे. पेट्रोल पंपातून खूप नफा होतो, असे म्हणतात. पण तसे नाही. कारण माझाही पंप आहे. फक्‍त लोकांची सोय होते, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Back to top button