माणसाला ‘गायब’ करणारे शिल्ड | पुढारी

माणसाला ‘गायब’ करणारे शिल्ड

न्यूयॉर्क ः ‘मिस्टर इंडिया’मध्ये घड्याळाचे बटण दाबताच अद‍ृश्य होणारा नायक दर्शवला होता. आता माणसाला असे गायब करणारे घड्याळ नव्हे; पण एक शिल्ड तयार करण्यात आले आहे. बि—टिश संशोधकांनी ही ‘इनव्हिजिबल शिल्ड’ तयार केले आहे. त्याच्या मागे जाताच व्यक्‍ती जणूकाही ‘गायब’ होते.

या शिल्डमध्ये एका खास लेन्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यावेळी शिल्डच्या मागे तीव— प्रकाश पडतो त्यावेळी तो फोकल पॉईंटवर रिफ्रॅक्ट होतो आणि इतरत्र पसरतो. शिल्डच्या समोरील भाग ‘शॅलो अँगल’ पर्यंत जातो आणि प्रकाश आतील बाजूने पसरू लागतो. हा डिफ्युजन, रेफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचा खेळ आहे. त्यामुळे शिल्डच्या मागे असलेला माणूस दिसत नाही.

शिल्डमध्ये वापरण्यात आलेली सामग्री अतिनील किरणे आणि उच्च तापमानही झेलू शकते. हे शिल्ड अतिशय मजबूत आहे. एकसारखी पार्श्वभूमी असेल तर त्यावर ही शिल्ड चांगली काम करते. ‘इनव्हिजिबिलिटी शिल्ड’ नावाच्या लंडनमधील कंपनीने ही बनवलेली आहे. कंपनीने आतापर्यंत अशा 25 शिल्ड तयार केल्या आहेत.

संबंधित बातम्या

हेही वाचलंत का? 

Back to top button