अनेक भारतीय एक वेळेच्या जेवणाऐवजी खातात स्नॅक्स! | पुढारी

अनेक भारतीय एक वेळेच्या जेवणाऐवजी खातात स्नॅक्स!

 दिल्‍ली : दोन वेळेला पौष्टिक, सकस आहार घेणे गरजेचे असते. असे परिपूर्ण जेवण घेण्याऐवजी देशातील अनेक लोक चटपटीत स्नॅक्स खाऊन भूक भागवतात. आता ‘स्टेट ऑफ स्नॅकिंग’ नावाने प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की देशातील 81 टक्के लोक दिवसातून किमान एक वेळेचे जेवण टाळून असे स्नॅक्स खातात.

मोंडेलेज इंटरनॅशनल आणि द हॅरीस पोल यांनी संयुक्‍तरीत्या याबाबतची पाहणी केली आहे. त्यामध्ये आढळून आले की भारतात सुमारे दहापैकी आठ लोक रोज एक वेळेच्या जेवणाऐवजी स्नॅक्स खाऊन पोट भरतात. बहुतांश लोक सायंकाळच्या वेळी स्नॅक्स खातात. चव, सोय आणि आवड यामुळे ते पौष्टिक आहाराऐवजी असे खाद्यपदार्थ खातात. हा शौक कोरोना महामारीने आणखीच वाढवला आहे. 83 टक्के भारतीयांनी म्हटले आहे की गेल्या तीन वर्षांपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स खाऊ लागले आहेत. 92 टक्के लोकांनी सांगितले की सोशल मीडियातील फूड कंटेंट पाहणे ते पसंत करतात. वैश्‍विक स्तरावर हे प्रमाण 62 टक्के आहे. 77 टक्के लोकांनी कबूल केले की सोशल मीडियामुळेच प्रेरित होऊन त्यांनी वर्षभरात किमान एक नवा स्कॅनचा पदार्थ खाल्‍ला आहे. वैश्‍विक स्तरावर हे प्रमाण 55 टक्के आहे.

हेही वाचलतं का? 

Back to top button