मोठ्या शहरांत चार्जिंग स्टेशनमध्ये 2.5 पट वाढ; इलेक्ट्रिक वाहनांना बुस्ट : ऊर्जा मंत्रालयाची माहिती | पुढारी

मोठ्या शहरांत चार्जिंग स्टेशनमध्ये 2.5 पट वाढ; इलेक्ट्रिक वाहनांना बुस्ट : ऊर्जा मंत्रालयाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 

देशातील ९ मोठ्या शहरांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत २.५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. सूरत, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, कोलकता, चेन्नई या नऊ शहरांत गेल्या चार महिन्यात चार्जिंग स्टेशनच्या संख्येत ही वाढ झाल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे.

ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात ६७८ इतके चार्जिंग स्टेशन या नऊ शहरांत नव्याने सुरू झाले आहेत. देशात एकूण १६४० चार्जिंग स्टेशन आहेत, त्यातील ९४० चार्जिंग स्टेशन या नऊ शहरांत आहेत.

 केंद्र सरकारने १४ जानेवारी २०२२ राेजी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठीचे नवे धोरण जाहीर केले हाेते. तसेच देशात इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा मिळत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या देशात वाढू लागली आहे. BEE. EESL, PGCIL, NTPC यांच्यासोबत प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिपमधून हे स्टेशन उभारले जात आहेत.

 मोठ्या शहरात चार्जिंग स्टेशनची सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सरकार टप्प्याटप्प्याने देशातील इतर शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे. देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी देशभरात २२००० चार्जिंग स्टेशन उभे करण्याची घोषणा केली आहे. यातील १० हजार स्टेशन IOCL, तर ७००० स्टेशन BPCL, तर ५००० स्टेशन HPCL उभे करणार आहे.

अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील २५ राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूने १५७६ चार्जिंग स्टेशन उभे करण्यास परवानगी दिली आहे. २५ किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूंनी हे चार्जिंग स्टेशन उभे राहणार आहेत.

 हेही वाचलं का ? 

Back to top button