जळगाव : महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत दोघांनी शेतीवरील हक्कसोड दस्त नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस | पुढारी

जळगाव : महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत दोघांनी शेतीवरील हक्कसोड दस्त नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : एरोडल तालुक्यातील पातोंडा येथील महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेत दोन जणांनी शेतावरील हक्कसोड लेखी दस्त नोंदणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, कमलबाई आनंदा महाजन (वय-६५) रा. महादेव चौक, पातोंडा ता. अमळनेर या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्याच्या नावे पातोंडा शिवारातील शेत गट नं. ६२६/२ आणि ५५६/१ मधील शेत आहे. सदरील शेत प्रल्हाद शामराव चौधरी रा. गणपती बाप्पा नगर धरणगाव आणि रमाबाई मधुकर चौधरी रा. रिंगणगाव ता. एरंडोल यांनी कमलबाई महाजन यांचा अशिक्षीतपणाचा फायदा घेत दोघांनी दोन्ही शेतावरील हक्क सोड दस्त नोंदणी केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, कमलबाई महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून संशयित आरोपी प्रल्हाद चौधरी आणि रमाबाई चौधरी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button