कॅलिफोर्निया : अंतराळ स्थानकावर चित्रपट शूटिंग अन् खेळही | पुढारी

कॅलिफोर्निया : अंतराळ स्थानकावर चित्रपट शूटिंग अन् खेळही

कॅलिफोर्निया : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या दशकाच्या मध्यावधीस एक नवा फिल्म स्टुडिओ व स्पोर्टस् एरिना तयार होणार आहे. ब्रिटनची एक कंपनी हे तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Picture Shooting www.pudhari.news
लंडनमधील स्पेस एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस नामक कंपनीने आयएसएसवर एक फिल्म, टीव्ही स्पोर्टस् व एंटरटेन्मेंट ब्रॉडकास्ट मॉड्यूल तयार करण्याची योजना आखली आहे. ही योजना 2024 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. आयएसएसवर या सुविधा प्राप्‍त करून देण्याची जबाबदारी अ‍ॅक्सिओम स्पेसला देण्यात आली आहे.

स्पेस एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस कंपनीकडे यापूर्वीच स्पेस एंटरटेन्मेंटची योजना होती. ही कंपनी टॉम क्रूज यांच्यासोबत एक चित्रपट तयार करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर केले जाणार आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील स्पेस एंटरटेन्मेंट सेंटरच्या भागाला एसईई-1 असे नाव देण्यात येणार आहे. ज्याला भविष्यात आयएसएसपासून वेगळे करून अ‍ॅक्सियम मॉड्यूलशी जोडले जाणार आहे. दरम्यान, अ‍ॅक्सियमकडून स्वतःचे एक नवे अंतराळ स्थानकही तयार करण्यात येत आहे.

Dhule Crime : प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून, उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर संशयित आराेपींवर गुन्‍हा दाखल

स्पेस एंटरटेन्‍नमेंट मॉड्यूल तयार करण्यासाठी किती खर्च येईल, हे आतापर्यंत सांगण्यात आलेले नाही. मात्र, जेव्हा हे तयार होईल, तेव्हा तेथे चित्रपट, टीव्ही शोच्या चित्रीकरणाबरोबरच तिसर्‍या पार्टीलाही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या अंतराळत कार्यरत असलेल्या अंतराळ स्थानकाला 2030 पर्यंत निधी पुरविण्यास वचनबद्ध असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button