हैदराबादमध्ये देशातील पहिले ‘दगडांचे संग्रहालय’-stone mesume | पुढारी

हैदराबादमध्ये देशातील पहिले ‘दगडांचे संग्रहालय’-stone mesume

हैदराबाद ः

(दगडांचे संग्रहालय )देश-विदेशात अनेक म्युझियम म्हणजेच संग्रहालये पाहायला मिळत असतात. मात्र, चक्‍क दगड-धोंड्यांचेही एखादे संग्रहालय असेल अशी आपण कल्पना करणार नाही.हैदराबाद मध्ये आता असे विविध प्रकारचे दगड दर्शवणारे देशातील पहिले संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतात हवामानापासून ते भाषा, संस्कृतीपर्यंत अनेक बाबतीत प्रचंड विविधता पाहायला मिळत असते. तशाच प्रकारे या खंडप्राय देशात भूवैज्ञानिक संरचनेतही प्रचंड विविधता आहे. सर्व भूगर्भीक कालखंडांमध्ये निर्माण झालेले खडक, शिळा आपल्या देशात आढळतात. खडकांची ही विविधता खनिज संपदेचे एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून पाहिली जाते.

याबाबतची माहिती असणेही महत्त्वाचे ठरते. वैज्ञानिक इतिहासाच्या आधारे भारतात सापडणारे खडक त्यांच्या निर्मितीक्रमानुसार क्रमशः आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य, गोंडवाना, दख्खन ट्रेप, टर्शियरी आणि क्‍वार्टनरी खडकांमध्ये वर्गीकृत होतात. येथे अगदी 3.3 अब्ज वर्षे ते 55 दशलक्ष वर्षांपूर्वीचेही खडक आहेत. ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 175 किलोमीटरपर्यंतच्या खोलीवरून वेगवेगळ्या स्तरांतून काढलेले आहेत. विविध राज्यांमधून मिळवलेले असे 35 खडक याठिकाणी ठेवण्यात आलेलेआहे.

 

Back to top button