सांगली : महापालिकेला ‘नगररचना’तून उच्चांकी उत्पन्‍न

सांगली : महापालिकेला ‘नगररचना’तून उच्चांकी उत्पन्‍न
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेला नगररचना विभागाकडून डिसेंबर 2021 अखेर 27.87 कोटी रुपये इतका उच्चांकी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न दुप्पट आहे. 'यूडीसीपीआर'चा महापालिका आणि नागरिक या दोहोंना लाभ मिळवून देण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी राबविलेले धोरण, गुंठेवारी नियमितीकरण शिबीरासाठी घेतलेला पुढाकार, प्रलंबित बांधकाम परवान्यांचा निपटारा यातून ही उत्पन्नवाढ शक्य झाली आहे.

महापालिकेच्या स्वउत्पन्नाच्या दृष्टीने नगररचना, मालमत्ता हे विभाग महत्वाचे आहेत. नगररचना विभागाने यावेळी उच्चांकी उत्पन्नवाढ केली आहे. सन 2018-19 मध्ये 8.28 कोटी, सन 2019-20 मध्ये 9.01 कोटी, सन 2020-21 मध्ये 13.85 कोटी रुपये एवढे उत्पन्न नगररचना विभागाकडून महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.सन 2021-22 साठी नगररचना विभागाकडून 20.77 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होतेे. प्रत्यक्षात डिसेंबर 2021 अखेरच 27.87 कोटी महसूल जमा झाला आहे. आर्थिक वर्षअखेरीस तीन महिने बाकी आहेत. तरिही दुप्पट महसुल वाढ झाल्याने महापालिकेला मोठा दिला मिळाला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातही मोठा महसूल जमा होण्याचे संकेत मिळत आहेत.

यूडीसीपीआर

युडीसीपीआर अर्थात युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अ‍ॅण्ड प्रोमोशन रेग्युलेशन्स फॉर महाराष्ट्र स्टेट (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) दि. 2 डिसेंबर 2020 रोजी लागू झाले आहे. 'युडीसीपीआर'मुळे बांधकाम परवान्यामध्ये सुलभता आली आहे. वाढीव शुल्क भरून जादा एफएसआय, जादा बांधकाम शक्य शक्य झाले.

युडीसीपीआर अंतर्गत प्रिमियम एफएसआय तरतुदीमुळे बांधकाम परवान्यासाठी रेडिरेकनर दरानुसार जादा शुल्क भरून जादा एफएसआय वापरता आला. जादा बांधकाम करता आले. अ‍ॅन्सलरी एफएसआय (सहायक विकास शुल्क) अंतर्गत बांधकामाचे प्रस्ताव आले. त्यातूनही उत्पन्नवाढ झाली. हार्डशिप प्रिमियमचाही वापर झाला. साईड मार्जिनचा वापर बांधकामासाठी केलेल्यांकडून नगररचना विभागाने दंड भरून घेऊन बांधकाम परवाना दिला. त्यातूनही उत्पन्न वाढ झाली. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचनाचे सहायक संचालक विनय झगडे व विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रलंबित प्रस्तावांचा बर्‍यापैकी निपटारा केला.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुंठेवारी नियमितीकरणासाठी शिबीर घेतले. प्रशमन शुल्क, विकास शुल्क मोठ्याप्रमाणावर जमा झाले. महापालिकेचे उत्पन्न वाढले आणि नागरिकांचाही बांधकाम नियमित करण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत 'कोरोना'ने घेतलेली उसंत यामुळे बांधकामांना चालना मिळाली. एकूणच सर्वच बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून महापालिकेच्या तिजोरीत नगररचना विभागाने जादा माप टाकले आहे.

नगररचना विभाग

  • सन 2018-19 : 8.28 कोटी
  • सन 2019-20 : 9.01 कोटी
  • सन 2020-21 : 13.85 कोटी
  • डिसेंबर 21 अखेर : 27.87 कोटी

हे पाहा : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका | Cover Song of Jai Bhim | Jay bhim movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news