

मुंबई : पुढारी डेस्क : तोकड्या कपड्यांमुळे वादग्रस्त बनलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed Fashion) भगव्या रंगाचा आक्षेपार्ह ड्रेस घालून भाजपच्या महिला आघाडीप्रमुख चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. या कपड्यांसह उर्फीने बनवलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईच्या रस्त्यावर उर्फीच्या शरीर प्रदर्शनाचे जे गळवाणे प्रकार सुरू आहेत, त्याचे महिला आयोग समर्थन करत आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
उर्फीबरोबर महिला आयोगही बेफाम झाले आहे का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी चाकणकर यांना विचारला आहे. चित्रा वाघ यांनी याआधीच मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करावी, या मागणीची तक्रार केली आहे. रूपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणी काय कपडे घालावे, हे ज्याने त्याने ठरवायला हवे. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याची यादी काढायची ठरवली तर ती फार मोठी होईल, त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ घालवू शकत नाही, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्यावर पलटवार करत 'माझा नंगा नाच सुरूच राहील', असे डिवचले आहे. चित्रा वाघ निव्वळ प्रसिध्दीसाठी माझ्या मागे लागल्या आहेत. राज्यात अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. या वादासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या गलिच्छ राजकारणासाठी कुठल्याही विषयावर महिलेवर बोलू नये, जी कुणाची तरी आई, मुलगी, मैत्रीण आहे, अशावेळी कै. अरुण जेटली आठवतात. ते म्हणायचे, तुम्ही दाखवणे बंद करा, लोक बोलणे बंद करतील.
प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणी काय कपडे घालावे, हे ज्याने त्याने ठरवायला हवे. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याची यादी काढायची ठरवली तर ती फार मोठी होईल, त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ घालवू शकत नाही, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा