सोलापूर : नववधूचे चोरलेले 16 तोळ्यांचे दागिने 24 तासांत जप्त

सोलापूर : नववधूचे चोरलेले 16 तोळ्यांचे दागिने 24 तासांत जप्त
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅव्हल्स बसधून प्रवास करणार्‍या नववधूचे दागिने असलेली पर्स चोरणार्‍यास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. दिलीप उर्फ धनुष रामण्णा माने (वय 24, रा. मंठाळ, महादेव मंदिराजवळ, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेले सर्व 6 लाख 80 हजार 420 रुपयांचे 164 ग्रॅम 840 मि.ली.चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

मरियम मशाक शेख (वय 23, रा. 407, ए विंग, कुरेशी कंम्पौड, बहिराम बाग, जोगेश्‍वरी पश्‍चिम, मुंबई) यांच्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मरियम शेख यांचे हुमनाबाद येथे लग्न असल्याने मुंबई येथून 15 जून रोजी सायंकाळी त्या व इतर नातेवाईक जय भवानी ट्रॅव्हल्स कंपनीच्या एनएल 01 बी 1265 या बसमधून प्रवास करीत होते. 16 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास बस नळदुर्गजवळ आली असताना त्यांना त्यांच्या बॅगेमधील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्‍कम चोरीस गेल्याचे दिसून आल्याने बसचालकाने बस सोलापूरमध्ये आणली. शेख यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फौजदार चावडी व शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करताना बसमधील सर्व प्रवाशांची चौकशी तसेच बसचालक मोहंमद इस्माईल कुरेशी व कंडक्टर यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी पोटात दुखत असल्याचे कारण सांगून सोलापुरात एकजण उतरल्याचे समजले.

पोलिसांनी उतरलेल्या प्रवाशाचे वर्णन घेऊन त्याचा शोध सोलापूर शहरात सुरू केला. त्यावेळी गुन्हे शाखेच्या एका पथकाला उतरलेल्या प्रवाशाच्या वर्णनाशी मिळतेजुळते वर्णन असलेला संशयित हा वल्याळ मैदानाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिलीप माने याची अंगझडती घेतल्यानंतर त्यावेळी त्याच्याकडे 6 लाख 80 हजार 420 रुपयांचा ऐवज मिळून आला. माने याला अटक करण्यात आली.'

यांनी कामगिरी पार पाडली

पोलिस आयुक्‍त राजेंद्र माने, उपायुक्‍त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे, पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, कर्मचारी महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, तात्यासाहेब पाटील, कृष्णात कोळी, विद्यासागर मोहिते, वसिम शेख, प्रकाश गायकवाड, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, विजय वाळके, महेंद्र ठोकळ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news