लोहगड किल्ल्याची डागडुजी करण्याची मागणी

लोहगड किल्ल्याची डागडुजी करण्याची मागणी
Published on
Updated on

कार्ला : काही दिवसांपूर्वी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला लोहगडवाडी येथे दरड कोसळली होती. त्यामुळे गावातील घरांना धोका असल्याने लोहगड किल्ल्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. लोहगड किल्ल्याच्या तटबंदीच्या खालचा मातीचा भाग कोसळला आहे. तसेच, खालच्या बाजूला स्थानिकांची घरे आहेत.

सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. या जागेची लवकर दुरुस्ती करून तटबंदीला आधार दिला नाही तर पुढील काही दिवसांत मोठी दुर्घटना घडून तटबंदी ढासळू शकते. तसेच, मावळातील सर्व गडांची डागडुगी करावी. यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी विभाग संयोजक संदेश भेगडे, बाळासाहेब खांडभोर, सुनील ढोरे, विश्वास दळवी, विशाल ढोले आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news