राजापुरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

राजापुरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
Published on
Updated on

राजापूर ः पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक कार्यरत असलेल्या राजापूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसह या वर्षाच्या अखेरीला मुदत संपत असलेल्या 31 अशा तब्बल 41 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पूर्वतयारीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणार्‍या निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आतापासूनच राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

तालुक्यातील सागवे, देवाचेगोठणे, वडदहसोळ, आंगले, भालावली, केळवली, मूर, राजवाडी, मोगरे, कोंड्येतर्फ सौंदळ या दहा ग्रामपंचायतीच्या मुदती यापूर्वी संपल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे या ग्रामपंचातीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. त्याचवेळी तालुक्यातील तब्बल 31 ग्रामपंचायतींच्या या वर्षअखेरीला मुदती संपणार आहेत. सद्य:स्थितीमध्ये कमी झालेल्या कोरोना महामारीमुळे या सर्व 41 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने प्रशासनाने निवडणूक पूर्वतयारीचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये प्रशासकांमार्फत सध्या कारभार पाहत असलेल्या दहा ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अपडेट करण्याचे काम केले जात आहे. त्याचवेळी उर्वरित 31 ग्रामपंचायतींच्या सदस्यांची आरक्षण निश्‍चिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रा.पं. निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित होत असल्याने या निवडणुकांना राजकीय पक्षांकडून विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे तालुक्यातील 101 पैकी तब्बल 41 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असलेल्या ग्रामपंचायती

सागवे, देवाचेगोठणे, वडदहसोळ, आंगले, भालावली, केळवली, मूर, राजवाडी, मोगरे, कोंड्येतर्फ सौंदळ, मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटूळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news