रत्‍नागिरी : माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम ची सुरुवात गुहागरमधून

रत्‍नागिरी : माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम ची सुरुवात गुहागरमधून
Published on
Updated on

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : कोविड महासाथीने सरकारी आरोग्यसेवेच्या क्षमता आणि कमतरता, या दोन्हींची जाणीव झाली. खाजगी आरोग्यसेवेच्या मर्यादाही दिसल्या. या काळात सर्वसामान्यांना सरकारी आरोग्य व्यवस्थेनेच खरा आधार दिला, मात्र या यंत्रणेतील कमतरता दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबईतील संपर्क या संस्थेने माता बालस्नेहीची प्राथमिक आरोग्य केंद्र ची संकल्पना मांडली. यामध्ये युनिसेफ आणि प्रथम फौंडेशनने सहकार्याची भूमिका घेतली. माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र ची सुरुवात गुहागर मधून तळवळी येथून व्हावी यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या प्रकल्पाची सुरुवात तळवली गावातून होत आहे.

याचाच शुभारंभ गुरुवारी सकाळी ११ वाजता तळवली ग्रामपंचायत येथे आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

आरोग्य यंत्रणेतल्या कमतरता दूर करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून चालणार नाही, तर लोकसहभागातून गावागावातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे.

जेणेकरून अधिक उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाण्याची वेळ लागू नये विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीची सेवा मिळावी

यासाठी संपर्क संस्थेने माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र हा प्रकल्पाची संकल्पना एप्रिलमध्ये मांडली होती. यासाठी युनिसेफ आणि प्रथम फाउंडेशनचे सहकार्यही संस्थेला लाभत आहे.

राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींकडे या विषयी चर्चा करण्यात आली होती, पत्रही पाठवण्यात आले होते, मात्र यामध्ये गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी ही संकल्पना उचलून धरली, संस्थेशी चर्चा केली.

आरोग्य क्षेत्रातील एक उत्तम दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करण्यासाठी जे काही करता येईल ते करू असे त्यांनी बैठकीत सांगितले होते, त्याप्रमाणे याची मुहूर्तमेढ १६ सप्टेंबर रोजी होत आहे.

संपर्क, युनिसेफ, प्रथम शैक्षणिक फौंडेशन यांच्या मार्फत माता बालस्नेही प्रकल्प अंतर्गत तळवली गावातील अंगणवाडी, आशा सेविका, तरुणांना याविषयी प्रशिक्षण देणार आहे,

गावांतील लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी केला जाणार आहे. माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर त्वरित डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्या शिवाय गरोदर मातांचे समुपदेशन, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल,

आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळतेय का? यासाठी एक टीम या ठिकाणी कार्यान्वित राहील, तसेच या आरोग्य केंद्रात लहान मुलांसाठी खेळणी व इतर साहीत्य ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम फौंडेशन कडून २ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्यात येणार आहेत.

समाजातला सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुलं. तेव्हा बालविकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. म्हणून पीएचसी सक्षम करण्यासाठी आमदार आणि स्थानिक प्रशासन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची जबाबदारी पेलतील.

पण सुविधांबरोबरच मनुष्यबळ गरजेचे आहे. पीएचसी सेवा देते त्या प्रत्येक गावातील काही युवक-युवतींची निवड केली आहे.

त्यांना आरोग्य आणि रुग्णसेवा या बरोबरच, कुपोषण, गरोदरपणात घ्यायची काळजी, स्तनपानाचं महत्व, मासिक पाळीच्या दिवसांतलं आरोग्य अशा मानवी जीवनचक्राशी निगडित विषयांवर संपर्क, युनिसेफ आणि प्रथम संस्था मिळून प्रशिक्षण देणार आहे.

यामुळे एका सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आरोग्यदूत मुलामुलींची एक टीमच तयार होईल.

ही टीम पीएचसीला मदत करेल आणि गावातल्या गावातही सेवा देऊ शकेल. यामुळे गावपतळीवरची आरोग्ययंत्रणा बळकट होण्यास मदत होईल. प्रशिक्षित मुलामुलींना स्वकमाईचं एक साधनही मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news