चांदोली धरणातून ८ हजार २०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग | पुढारी

चांदोली धरणातून ८ हजार २०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

वारणावती : पुढारी वृत्तसेवा

चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढला आहे. गेल्या २४ तासांमध्‍ये ३७ मिलिमीटर तर आज अखेर २८१२ मिलिमीटर पाऊस या ठिकाणी पडला आहे. त्यामुळे धरण आता जवळपास शंभर टक्के भरल्यात जमा आहे. ३४.४० टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात सध्या ३४.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणाचे चारही दरवाजे सध्या उघडण्यात आले असून, येथून ६ हजार ८२८ तर वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ३७७ असा दोन्ही मिळून चांदोली धरणातून ८२०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.

धरणात सध्या ९९.८६ टक्के पाणीसाठा असल्यामुळे जितक्या प्रमाणात पाण्याची आवक होईल तितक्याच प्रमाणामध्ये विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धरणातून सुरू असणाऱ्या ८२०५ पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली असून काही ठिकाणी वारणा नदीचे पात्र पाण्याबाहेर गेले आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर विसर्ग आणखीन वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी 626 .85 मीटर असून पाण्याची आवक पाच हजार 482 क्यूसेक्स इतकी आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button