पोलिसांच्या मदतीने माझा खात्मा करण्याचा प्रयत्न होता : किरीट सोमय्या

पोलिसांच्या मदतीने माझा खात्मा करण्याचा प्रयत्न होता :  किरीट सोमय्या
Published on: 
Updated on: 

दापोली, पुढारी वृत्तसेवा : अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी गेल्या वेळेस मी हातोडा घेऊन आलो होतो. तेव्हा पोलिसांनी मलाच अटक केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफियांकडून पोलिसांच्या मदतीने माझा खात्मा करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

या वेळी सोमय्या म्ह‍णाले, "तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांचा साई रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोली आलो होतो. या वेळी पोलिसांनी मुरुड येथे जाण्यास मज्जाव केला. दुसरीकडे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते देखील मोठया संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे ही परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र आम्‍ही रिसॉर्टकडे जात असताना पोलिसांनी अडवून आमच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news