पंढरपूर पंचायत समिती आरक्षण जाहीर
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 20 पैकी ५ जागा ना. मा. प्रवर्ग (ओबीसी) करीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारणसाठी महिलेसह १२ जागा तर अनुसूचित जातीकरीता महिलेसह ३ जागेवर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आरक्षण जाहीर केले. पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे झालेल्या या आरक्षण सोडत प्रसंगी तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे आदी उपस्थित होते.
पंढरपूर पंचायत समितीचे गण व आरक्षण पुढील प्रमाणे
उंबरे – सर्वसाधारण, भोसे – अनुसूचित जाती महिला, करकंब – सर्वसाधारण, मेढापूर- सर्वसाधारण महिला, रोपळे – सर्वसाधारण महिला,
देगाव – सर्वसाधारण महिला, फुलचिचोली – सर्वसाधारण.
पुळूज – सर्व साधारण, चळे – सर्वसाधारण महिला, गोपाळपूर – ना. मा. प्र. महिला, गुरसाळे – ना. मा. प्र.,
पिराचीकुरोली – अनुसूचित जाती, भाळवणी – सर्वसाधारण, पळशी-ना. मा. प्र. महिला, भंडीशेगाव-सर्वसाधारण, वाखरी – अनुसूचित जाती महिला, टाकळी – ना. मा. प्र, खर्डी- सर्वसाधारण, कासेगाव – ना. मा. प्र महिला, तावशी – सर्वसाधारण महिला.
पंढरपूर पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवार दि. २८ जुलै रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याबाबत दि. २ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. तर पंचायत समितीला यावेळेस दोन गट तर चार गणांची भर पडले आहे. त्यामुळे १० जिल्हा परिषद गट तर २० पंचायत समिती गणात निवडणूक होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील २० गणात ९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर २०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख ४३ हजार ४४५ लोकसंख्या आहे. यात अनुसुचित जातींची लोकसंख्या ५५ हजार ९७३ इतकी आहे. तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ६ हजार ९५६ इतकी आहे. इच्छुकांना अपेक्षित असे आरक्षण पडेल, असे वाटत असताना आता ते न पडल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर महत्वाच्या जागेवर ओबीसींचे आरक्षण पडल्याने सर्वसाधारणवाले डोक्याला हात लावून बसले आहेत. तर परिचारक गट, भालके-काळे गट व आ. समाधान आवताडे गटांना उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. राज्यकर्त्यांना अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार मिळणेही कठीण होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओबीसींचे या पाच जागेवर पडले आरक्षण –
न्यायालयाने ओबीसींना निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. पंढरपूर पंचायत समितीमध्ये २० पैकी ५ जागेवर आरक्षण मिळाले आहे. गोपाळपूर, गुरसाळे, पळशी, लक्ष्मी टाकळी, कासेगाव या गणांमध्ये ओबीसी उमेदवार प्रतिनिधित्व करणार आहेत.

