नाशिकरोड : ॲक्टिव सोशल संस्था संचलित अक्टिव लेडीज ग्रुप आयोजित हळदी कुंकू आणि उखाणा स्पर्धेत विजेत्या महिलांचा सत्कार करताना सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर , कमला राजपुरोहित, प्रमोद साखरे, सायली साखरे आदी. (छाया उमेश देशमुख )
नाशिकरोड : ॲक्टिव सोशल संस्था संचलित अक्टिव लेडीज ग्रुप आयोजित हळदी कुंकू आणि उखाणा स्पर्धेत विजेत्या महिलांचा सत्कार करताना सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर , कमला राजपुरोहित, प्रमोद साखरे, सायली साखरे आदी. (छाया उमेश देशमुख )

नाशिक : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर यांच्या उपस्थितीत उखाणा स्पर्धा

Published on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

ॲक्टिव सोशल संस्था संचलित ॲक्टिव लेडीज ग्रुप आयोजित हळदी कुंकू आणि उखाणा स्पर्धा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर उपस्थित होते. व्यासपीठावर कमला राजपुरोहित हे देखील उपस्थित होते.

स्पर्धेमधे 55 महिलांनी सहभाग नोंदविला विनोदी मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक उखाणे महिलांनी सादर केले. यामध्ये प्रथम पारितोषिक शालिनी घुसले, द्वितीय पारितोषिक कल्पना निमसे, तृतीय पारितोषिक वैशाली मेटकर यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमिला चव्हाण, उर्मिला काळे यांनी मिळवले. प्रमुख अतिथी प्रणव प्रभाकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. अभिजीत आहेर, डॉ. मेघना आहेर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता बोढारे, समीक्षा गांगुर्ढे, कविता चव्हाण, सुनीता निकम, नेहा साखरे, श्रीकांत उन्हवने, विशाल साखरे, किशोर गुंजाळ, संतोष पगारे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सायली प्रमोद साखरे यांनी केले. चंद्रशेखर पगारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद साखरे यांनी आभार मानले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news