नाशिक : उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखांनी घेतला साक्री तालुक्यातील आढावा

पिंपळनेर : साक्री तालुका प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने दत्तू बोडके यांचा सत्कार करताना उपतालुका अध्यक्ष नाना शेलार, संपर्क प्रमुख योगेश जाधव, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमा सूर्यवंशी आदी मान्यवर. (छाया:अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : साक्री तालुका प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने दत्तू बोडके यांचा सत्कार करताना उपतालुका अध्यक्ष नाना शेलार, संपर्क प्रमुख योगेश जाधव, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमा सूर्यवंशी आदी मान्यवर. (छाया:अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्रातील साक्री तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे काम वेगाने सुरू असल्याने राज्यमंत्री बच्चू  कडू यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन समस्यांचे निराकरण करून येथील प्रश्न सोडवण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आले आहेत.

तसेच साक्री तालुक्यात जास्तीत जास्त शाखा उद्घाटन करण्याचे आदेश दत्तू बोडके यांच्याकडून देण्यात आल्याने साक्री तालुका प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने बोडके यांचा सत्कार करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा यांच्या कामाचे देखील दत्तू बोडके यांनी कौतुक केले. यावेळी उपतालुका अध्यक्ष नाना शेलार, संपर्क प्रमुख योगेश जाधव, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमा सूर्यवंशी, दिव्यांग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र कोरडकर यांनी जास्तीत जास्त शाखांचे उद्घाटन करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यावेळी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news