धुळे : वाढीव मालमत्ताकराविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी आक्रमक

धुळे : वाढीव मालमत्ताकराविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी आक्रमक

धुळे : पुढारी वृत्तसेवा
भाजप प्रशासनाच्या वाढीव मालमत्ता कर व वाढीव घरपट्टी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून घरपट्टीच्या नोटिसा जाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

धुळे महानगरपालिकेतील भाजप प्रशासनाने मनपा हद्दीतील व हद्दवाढीतील 11 गावांमध्ये मालमत्ता कर व घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास पाच पटींनी ही दरवाढ सुचविण्यात आली असल्याने प्रशासनाने नागरिकांना नोटिसा देण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील वलवाडी, भोकर, बाळापूर, मोराणे, नकाणे, पिंपरी, चितोड, अवधान, महिंदळे, वरखेडी, अंशत नगाव या गावांतील मालमत्ता व घरांचा सर्वेक्षण करून चार ते पाच पटींनी मालमत्ता कर व घरपट्टीमध्ये वाढ सुचवलेली आहे. यामुळे धुळेकर नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडणार आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन वाढीव मालमत्ता कर व वाढीव घरपट्टी त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news