Maharashtra : पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ‘ग्रामीण कौशल्य विकास’ केंद्रांचे उद्घाटन
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी ३४ जिल्ह्यांमध्ये ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन उद्या (१९ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होईल. पंतप्रधान कार्यालयातर्फे आज या संदर्भात माहिती देण्यात आली.(Maharashtra)
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये सुमारे १०० तरुणांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पॅनल वर असलेल्या औद्योगिक भागीदारांद्वारे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या विविध संस्थांमार्फत दिले जाईल. या केंद्रांच्या स्थापनेमुळे या क्षेत्रात अधिक सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी लक्षणीय प्रगती साधण्यात मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
हेही वाचा
- Rahul Gandi Targets Adani: कोळसा आयातीतून अदानींचा १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार; राहुल गांधींचा उद्योगपती अदानींवर पुन्हा हल्लाबोल
- Nishikant Dubey Vs Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप, भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस
- मुंबई : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद
- Nashik Drugs Case : पाचही कामगारांना एमडी कारखान्यातून बाहेर पडण्यास होती मनाई, 'इतका' दिला जायचा पगार

