Nishikant Dubey Vs Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप, भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस | पुढारी

Nishikant Dubey Vs Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप, भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोपांची लोकसभा समितीने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर लोकसभेच्या इथिक्स समितीने कारवाईचा बडगा उगारला आहे. दुबे यांना २६ ऑक्टोबर रोजी समितीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. ( Nishikant Dubey Vs Mahua Moitra)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात, असा आरोप दुबे यांनी केला आहे. भाजप खासदाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर भाजप लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ( Nishikant Dubey Vs Mahua Moitra)

महुआ मोईत्रा यांच्या निलंबनाची मागणी (Mahua Moitra)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची आणि त्यांना सभागृहातून ‘तात्काळ निलंबित’ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. ‘महुआ संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात.’ असे दुबे यांनी म्हटले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील नव्या राजकीय लढतीची ही सुरुवात मानली जात आहे. (Mahua Moitra)

Back to top button