निपाणीतील युवकाचे अपहरण करून खून; भुदरगड तालुक्‍यातील किल्‍ला पायथ्‍याशी आढळला मृतदेह

निपाणीतील युवकाचे अपहरण करून खून; भुदरगड तालुक्‍यातील किल्‍ला पायथ्‍याशी आढळला मृतदेह
Published on
Updated on

निपाणी : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती भागातील एका (30 वर्षीय) युवकाचा पैशाच्या व्यवहारातून अपहरण करून दोघा मित्रांनी खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. दोघा मित्रांनी त्याला स्वतःच्या दुचाकीवरून निपाणीपासून सुमारे 60 कि.मी.अंतरावरील भुदरगड तालुक्यात नेवुन त्‍याचा निर्घुण खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे. राहुल (वय 30) पूर्ण नाव समजू शकले नाही. या घटनेमुळे निपाणीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

खून झालेला युवक हा हुक्केरी तालुक्यातील एका खेडेगावातील रहिवासी असून, तो एका नामांकीत बेकरी व्यवसायासाठी मार्केटिंग करीत होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून निपाणी शहरातील मध्यवर्ती भागात आपल्या कुटुंबियासह तो राहावयास होता. दरम्यान खून झालेल्या युवकाला दोघांनी सोमवारी रात्री निपाणीतुन दुचाकीवरून भुदरगड तालुक्यातील किल्ला पायथ्याशी निर्जन जंगलामध्ये नेवुन त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून, चिकोडीचे उपाधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी भुदरगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मदतीने फरार संशयितासह या एकूण प्रकरणाचा शोध चालवला आहे. विशेष म्हणजे खून करणाऱ्या संशयितामध्ये एक निपाणीतील तर दुसरा मुंबईतील असल्याचे समजते. त्या दृष्टीने पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news