मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. "महाराष्ट्र सदन प्रकरणात खोटे-नाटे आरोप करण्यात आले. आज ना उद्या आम्हाला न्याय मिळणारच होता. आमचा न्यायदेवतवर विश्वास आहे.आज दुखःचा पाढा वाचणार नाही. कोर्टाने मला दोषमुक्त केल्यामुळे ईडीच्या गुन्ह्यालाही काही अर्थ नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील ८०० कोटींचा आरोप खोटा होता. त्यामुळे सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही हो सकता", अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.