पुणे : पिफ : मनोजकुमार, इनॉक डॅनियल यांना पुरस्कार

पुणे : पिफ : मनोजकुमार, इनॉक डॅनियल यांना पुरस्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत प्रदान करण्यात येणारा 'पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड फॉर आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा' पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आणि ज्येष्ठ संगीतकार इनॉक डॅनियल यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच या वर्षीचा 'एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड' पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.

हे सर्व पुरस्कार गुरुवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच वाजता मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे आयोजित महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी ही माहिती कळविली आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियंका बर्वे हे सहकलाकारांसह गायन सादर करतील. अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि सहकलाकार नृत्य सादर करतील. सायंकाळी 7:30 वाजता अली अब्बासी यांनी दिग्दर्शन केलेली फिल्म 'होली स्पायडर' ही महोत्सवाची 'ओपनिंग फिल्म' म्हणून दाखविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news