औरंगाबाद : वैजापुरात कार-दुचाकी अपघातात दोन ठार

औरंगाबाद : वैजापुरात कार-दुचाकी अपघातात दोन ठार
Published on
Updated on

वैजापूर; पुढारी वृत्तसेवा: भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेजण ठार झाले. हा  अपघात आज (दि.७) दुपारी दीडच्या सुमारास औरंगाबाद- शिक राष्ट्रीय महामार्गावरील बाजरा संशोधन केंद्राजवळ घडली. गौतम सखाहरी बागुल (वय ३७, रा. खंडाळा) व भाऊसाहेब कारभारी पवार (वय ५०, रा. सावतावाडी, खंडाळा) अशी   ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ कासलीवाल कारने ( क्रमांक एमएच. डी. जे. 5679) औरंगाबादहून वैजापूरकडे येत होते. त्याचवेळी तालुक्यातील खंडाळा येथील गौतम बागुल व भाऊसाहेब पवार हे दोघे दुचाकीवरून (क्रमांक एमएच. 20 डी. जी. 9559) वैजापूरहून खंडाळ्याकडे जात होते. यावेळी कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भाऊसाहेब पवार हे जागीच ठार झाले. तर गौतम बागुल हे गंभीर जखमी झाले. दोघांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. भाऊसाहेब पवार यांचा उपचारापूर्वी  मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी घोषित केले. गौतम बागुल यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news