Kiara Advani : ‘तू लांब कोट असलेली पॅंट का विकत घेत नाहीस?’ : ‘या’ कारणामुळे कियारा झाली ट्रोल…

Kiara Advani
Kiara Advani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ( Kiara Advani ) तिच्या अभिनयासोबत स्टाईलने नेहमीच चाहत्यांना भूरळ घालत असते. कियारा नेहमी सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमधील फोटोज आणि व्हिडिओज शेअर करून चाहत्याच्या सपंर्कात राहत असते. नेटकरीही तिच्या वेगवेगळ्या स्टाईलचे भरभरून कौतुक करत असतात. परंतु, यावेळी कियाराने घाललेल्या कपड्यामुळे तिचे कौतुक होत नाही, तर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरने नुकतेच त्याच्या घरी 'जुग जुग जिओ' चित्रपटाची सक्सेस पार्टीचे आयोजित केले होते. या पार्टीला बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवानीसोबत ( Kiara Advani ) अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. परंतु, खास करून कियाराने या पार्टीसाठी खास सुपर स्टनिंग लूक कॅरी केला होता. परंतु, तिचा हा लूक चाहत्याच्या पंसतीस उतरला नाही.

या पार्टीत कियाराने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेससोबत ग्रीन पेस्टल रंगाचे ओव्हरसाइज्ड ब्लेजर परिधान केले आहे. यासोबत न्यूड ग्लोइंग मेकअप, केसांची स्टाईल, हाय हिल्सने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.  कियाराने यावेळी एक छोटी पर्सदेखील कॅरी केली आहे. कियाराचा हा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 'Beautiful ? ? ? , #KiaraAdvani for a bash at Karan Johar's pad' असे कॅप्शन लिहिली आहे. या व्हिडिओत कियाराने घातलेल्या ड्रेसपैक्षा तिचे ब्लेजर खूपच लांब दिसतेय आणि तिने यावर पॅन्ट घातलेले नसल्याने चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे.

कियाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच काही नेटकऱ्यांनी भरभरून तिचे कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांना तिचा लूक आवडला नसल्याने ट्रोल केले. 'कियारा पॅन्ट घालायला विसरली काय?', 'तू लांब कोट असलेली पॅंट का विकत घेत नाहीस?' यासारख्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ५५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का?

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news