नाथसागर धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्वच २७ दरवाजे उघडले

नाथसागर धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्वच २७ दरवाजे उघडले

Published on

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर  सुरू असल्यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह यावर्षी प्रथमच २७ दरवाजे खुले करण्यात आले आहेत. गोदावरी नदीत ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे.

शुक्रवारी (दि. १६) रोजी नाथसागर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढू लागला. दरम्यान पाणी पातळी वाढल्यामुळे सर्वच दरवाजासह धरणाचे क्रमांक १ ते ९ असे एकूण ९ आपत्कालीन दरवाजे पाच फूट खुले करण्यात आले आहेत. गोदावरी नदीमध्ये ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन प्रमुख तहसीलदार शंकर लाड यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news