पाचोड, पुढारी वृत्तसेवा : एका शेतकरी कुटुंबातील पन्नास वर्षीय महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना दावरवाडी ता.पैठण येथे बुधवारी (दि १ जून) दुपारी उघडकीस आली. छबुबाई सखाराम धारे वय (५० ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अद्याप आत्महत्या करण्यामागचे प्रमुख कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी,दोन मुले सून असा परिवार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दावरवाडी येथील छबुबाई धारे यांनी बुधवारी दुपारी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केल्यानंतर नातेवाईकांना ही बाब कळताच त्यांना तात्काळ पैठण येथील रुग्णालयात दाखल करण्यात केले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सदर घटना पाचोड पोलिस ठाणे हद्दीत असल्याने या घटनेच्या मृत्यूची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली. तसेच शवविच्छेदन पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता करण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर आर अंबेकर, संतोष चव्हाण आदी करत आहेत.