ताप आलाय | पुढारी

ताप आलाय

पांढर्‍या रक्त पेशी संसर्गाशी लढा देतात म्हणून पांढर्‍या पेशींची वाढलेली पातळी संसर्गाचे सूचक आहे. ही चाचणी घेऊन तुम्हाला काही संसर्ग झाला आहे की नाही, हे डॉक्टर ठरवू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.

टायफॉईड तापासाठी वाईडल टेस्ट

ही सॅल्मोनेला टायफी, साल्मोनेला पॅराटाइफी ए., बी., आणि सी.ची उपस्थिती शोधण्यासाठी घेतली जाते, जे आतड्यांसंबंधी तपासास फायदेशीर ठरतात. या चाचणीमध्ये, रुग्णाच्या सीरम आणि साल्मोनेला अँटिजेन यांच्यातील एकत्रित प्रतिक्रिया सकारात्मक होऊ शकते. म्हणून तुम्हाला सावध राहावे लागेल आणि वेळेवर काळजी घ्यावी लागेल.

मलेरिया शोधण्यासाठी चाचणी

मलेरिया परजीवीची उपस्थिती शोधण्यासाठी वापरली जाते. या चाचणीमध्ये, एखाद्याचे रक्त गोळा केले जाते आणि एका स्लाईडवर जाड स्मीअर बनवले जाते, ज्याचे सूक्ष्मदर्शकाखाली परजीवींच्या उपस्थितीसाठी विश्लेषण केले जाते. मलेरियाचा सामना करण्यासाठी क्युबीसी मलेरिया चाचणी अचूक मानली जाते.

डेंग्यू शोधण्यासाठी चाचणी :

इएलआयएसए (इन्झाईम-लिंक इम्युन सॉर्बंट असे) ही डेंग्यूबद्दल जाणून घेण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी चाचणी आहे.
एकूण प्रोटिनची वाढलेली पातळी संसर्ग किंवा इतर दाहक स्थिती या चाचणीच्या माध्यमातून दर्शवते. सीएसएफमध्ये ग्लुकोजची कमी पातळी संसर्ग दर्शवू शकते.
ताप नियंत्रित करण्यासाठी
एक गुळगुळीत टॉवेल किंवा सुती कापड घ्या आणि थंड पाण्यात बुडवा, थंड टॉवेल मानेभोवती, कपाळावर आणि घोट्याभोवती गुंडाळा. ताप कमी येईल.

– बेरी, टरबूज आणि संत्री यांसारखी फळे खा, ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि ते संक्रमणाविरुद्ध लढू शकतात. मसालेदार, चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ टाळा.
– तापामुळे निर्जलीकरण होते. आपण शक्य तितके पाणी पिवून निर्जलीकरण टाळू शकता.
– पुरेशी विश्रांती घेतल्याने ताप लवकर कमी होतो. धावपळ केल्याने ताप वाढतो. श्रम, ताणतणाव यामुळेही ताप वाढतो. म्हणूनच विश्रांती गरजेची ठरते.

Back to top button