Gold Rate Today | सोने ६ महिन्यांच्या उच्चांकावर, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold Rate Today | सोने ६ महिन्यांच्या उच्चांकावर, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन : कमकुवत डॉलरमुळे सोन्याने आज मंगळवारी (दि.२८) सहा महिन्यांतील उच्चांक गाठला. डॉलर निर्देशांक सध्या तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा मागोवा घेत डिसेंबर सोने फ्यूचर्स एमसीएक्स (MCX) वर हिरव्या चिन्हात आज खुले झाले. आज सोन्याचा दर सोमवारच्या तुलनेत १०९ रुपयांनी म्हणजेच ०.१८ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६१,६४९ रुपयांवर गेला. दरम्यान, डिसेंबर चांदी फ्यूचर्स दर ०.२० टक्क्यांनी कमी होऊन प्रति किलो ७४,६५७ रुपयांवर आला. (Gold Rate Today)

संबंधित बातम्या 

डिसेंबर सोने फ्यूचर्स सोमवारी प्रति १० ग्रॅम ६१,५४६ रुपयांवर बंद झाले होते. तर डिसेंबर चांदी फ्यूचर्स ०.०२ टक्क्यांनी कमी होऊन प्रति किलो ७४,७९२ रुपयांवर स्थिरावले. काल गुरु नानक जयंतीनिमित्त पहिल्या सत्रात MCX वरील ट्रेडिंग बंद करण्यात आले होते.

का महागले सोने?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याचा दर सहा महिन्यांच्या शिखरावर गेला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचे चक्र डॉलर आणि यिल्डवर नियंत्रण ठेवेल, या अपेक्षेने सोन्याने उसळी घेतली आहे. स्पॉट गोल्ड दर ०.१ टक्क्यांनी वाढून प्रति औंस २,०१५.६५ डॉलरवर गेला आहे. यूएस डिसेंबर डिलिव्हरीच्या सोने फ्यूचर्स दर ०.२ टक्क्यांनी वाढून प्रति औंस २,०१६.१० डॉलर झाला आहे.

डॉलर निर्देशांक घसरला

दरम्यान, डॉलर निर्देशांक त्याच्या प्रतिस्पर्धी चलनांच्या तुलनेत जवळपास तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे. डॉलर निर्देशांक १०३.१२ वर व्यवहार करत आहे. हा निर्देशांक ०.०८ टक्क्यांनी खाली आला आहे. ज्यामुळे इतर चलन धारकांसाठी सोने कमी महाग झाले. तर १० वर्षांच्या ट्रेझरी नोट्सवरील यिल्ड्स ४.३६३० टक्क्यांवर दोन महिन्यांच्या निच्चांकावर गेले आहे. (Gold Rate Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news