बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू  | पुढारी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू 

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर टायरची हवा चेक करण्यासाठी थांबलेल्या एका खासगी बसला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात खाली उभा असलेला बसचालक व बसच्या मागील सीटवर बसलेला एक प्रवासी असे दोघे जण जागीच ठार झाले तर बसमधील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास मेहकरजवळ हा अपघात झाला. हरिश पांडुरंग ठाकरे ( वय ४५, रा. अमरावती),अरविंद भूषण गेन(५५ ,रा.गडचिरोली) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, नागपूरकडे जात असलेली खासगी बस (क्र.एमएच१४-एचजी५९९९) चालकाने पहाटेच्या सुमारास टायरची हवा चेक करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. दरम्यान, मागच्या टायरची हवा चेक करत असतांना पाठीमागून भरधाव आलेला ट्रक(क्र.डब्ल्यू बी२३,ई०८०३)ने बसला जोरदार धडक दिली. यात बस मागे उभा असलेला चालक व बसच्या मागील सीटवरील एक प्रवासी जागीच ठार झाला. मागील सीटवरील अन्य दोन प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button