शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा

शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ताजनापूर लिफ्टच्या पाण्यासाठी नऊ गावांच्या शेतकर्‍यांचा एल्गार पुकारला असून, अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या पुढाकाराने शेतकरी लवकरच मोठा लढा उभारणार आहेत. पाणी मिळेपर्यंत दम तोडणार नाही, असा निर्णय वाडगाव यथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील वरूर, आखेगावसह 9 गावांना ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.1 चे पाणी मिळण्यासाठी जनशक्ती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. काकडे, माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या उपस्थितीत वाडगाव येथे काल शेतकर्‍यांची बैठक झाली. या बैठकीत आता एकत्र आले पाहिजे, त्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असा इशारा अ‍ॅड. काकडे यांनी दिला.

यावेळी शहादेव जवरे, जगन्नाथ गावडे, भाऊसाहेब सातपुते, सरपंच शंकर काटे, विष्णू म्हस्के, बंडू म्हस्के, नवनाथ ढाकणे, भारत लांडे, भाऊसाहेब पोटभरे, संदीप दसपुते, देवदास गिर्‍हे, भाऊसाहेब राजळे, भगवान डावरे, भाऊसाहेब बोडखे, भगवान गायकवाड, आदिनाथ लांडे, विनोद मगर, अप्पासाहेब लांडे, नारायण टेकाळे आदी शेतकरी उपस्थित होते.

हर्षदा काकडे यांनी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.2 च्या लढ्यात महिलांचा मोठा सहभाग असल्याने त्यास यश आले. महिला एखाद्या लढ्यात उतरल्या, तर शासनालाही माघार घ्यावी लागते. त्यामुळे या नऊ गावाच्ंया पाण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी लढ्यात सामील होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नऊ गावांतील प्रमुख शेतकर्‍यांची पाणी कृती समिती निश्चित करण्यात आली.

बैठकीस गोरक्ष भोसले, नामदेव ढाकणे, नामदेव केदार, विक्रम बांगर, मिठूभाऊ बोडखे, तबाजी बोडखे, शिवाजी सातपुते, लक्ष्मण बोडखे, अशोक ढाकणे, अकबर शेख, माणिक गर्जे, पंडितराव नेमाने, अशोक पातकळ, विनोद पवार, ज्ञानदेव कातकडे, श्रीधर गोर्डे, आत्माराम गोर्डे,डॉ.अंकुश दराडे, वाडगावचे सरपंच सर्जेराव जवरे आदी शेतकरी उपस्थित होते.

या गावांना होणार लाभ

वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, आखेगाव, मुर्शदपूर, हसनापूर, खरडगाव, सालवडगाव, थाटे, वाडगाव या 9 गावांच्या शेतीला, बंद पडलेल्या ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.1 चे पाणी मिळावे, यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकर्‍यांची बैठक झाली.

आता पक्षीय आले एकत्र

नऊ गावांना पाणी मिळण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. परंतु, ते पक्षीय पातळीवर दुर्लक्षित केले गेले. सर्वेक्षण होऊनही हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. शांत बसल्यास हे पाणी कधीच भेटणार नाही. प्रत्येक शेतकरी लढ्यात सामील झाला, तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो. आता एल्गार करण्यास सज्ज व्हा, असे आवाहन अ‍ॅड. काकडे यांनी केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news