नाशिक महानगरपालिकेच्या नर्सरीत आग | पुढारी

नाशिक महानगरपालिकेच्या नर्सरीत आग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या जय भवानी रोडवरील नर्सरीत गुरुवारी (दि. 9) दुपारी आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी, नर्सरीतील कर्मचारी विष्णू बेंडकुळे, विजय शेजवळ, शिवसेनेचे पदाधिकारी विक्रम कदम आणि नागरिकांनी वेळीच पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. तथापि, आगीत रोपे व अन्य साहित्याचे नुकसान झाले असून, परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

जय भवानी रोडवर जेतवननगर येथे महापालिकेची जुनी नर्सरी आहे. येथून उद्यानांना रोपांचा पुरवठा केला जातो. मात्र, सध्या इतर उद्यानांतील खराब झालेली प्लास्टिकची खेळणी संबंधित ठेकेदार येथे आणून टाकतो. खेळणीतील स्टील काढून प्लास्टिक नर्सरीतच टाकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नर्सरीत प्लास्टिक कचरा, भंगाराचे साम्राज्य झाल्याने ही नर्सरी आहे की कचरा डेपो, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. संबंधित ठेकादाराने प्लास्टिक त्वरित उचलावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. फेकून दिलेल्या प्लास्टिकला आग लागली. ती भडकून काही रोपांचेही नुकसान झाले. नर्सरीत रात्री एकच कर्मचारी असतो. रात्री आग लागली असती तर मोठी हानी झाली असती. यामुळे महापालिकेने या नर्सरीचे पुनरुज्जीवन करावे. तिचा योग्य वापर करावा. तुटलेली खेळणी व अन्य टाकाऊ साहित्य येथे टाकून नर्सरीचा कचरा डेपो करणे बंद करावे. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा विक्रम कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button