HBD Farhan Akhtar : पन्नाशी गाठायला आलेला फरहान स्वत:ला कसा ठेवतो फिट

farhan akhtar
farhan akhtar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड (Bollywood) चा ऑल राऊंडर कलाकार फरहान अख्‍तर (HBD Farhan Akhtar) आज ९ जानेवारी रोजी ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर फॅन्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday) देत आहेत. फरहान केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर फिटनेस (Fitness) साठीही चर्चेत असतो. मध्यंतरी त्याचा 'तूफान' चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये त्याची दमदार बॉडी पाहून सर्वांचे डोळे खुले राहिले होते. त्याचा फिटनेस लोकांच्या पसंतीस उतरला. तुम्हाला माहितीये का, फरहान आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेतो. (HBD Farhan Akhtar)

फरहान अख्तरचा जन्म ९ जानेवारी, १९७४ रोजी मुंबईत झाला होता. फरहानचे वडील जावेद अख्तर इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आहेत. आई हनी इरानी एक अभिनेत्री आणि स्क्रीन रायटर आहे.

फरहान अख्‍तरला (Farhan Akhtar) फिट राहणं खूप आवडतं. तो खूप मेहनतदेखील करतो. तो जिममध्ये तासनतास घाम गाळतो. आउट डोर गेम आणि अॅक्टिव्हिटीमध्ये तो सहभागी होतो.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित चित्रपट 'तूफान' (Toofan)मध्ये फरहान अख्तर (Farhan Akhtar) ने बॉक्‍सरची भूमिका साकारली होती. फरहानला या लुकसाठी परदेशी एक्सपर्टसह ४-५ लोकांच्या टीमने मदत केली होती.

'तूफान'मध्ये त्याने आपली शरीरयष्टी दाखवली. एक बॉक्सर म्हणून त्याने कमावलेली शरीरयष्टी त्याने केलेल्या मेहनतीचे फळ होते. त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं संपूर्ण श्रेय फिटनेस इंडस्ट्रीमध्ये २३ ‍ वर्षे अनुभव असणाऱ्या सेलेब्रिटी फिटनेस कोच समीर जौरा (Celebrity fitness coach Samir Jaura) यांना जाते.

असा असतो डाएट प्लॅन

फरहान आपल्या डाएटची खास काळजी घेतो. घरचे जेवण खाणे अधिक पसंत करतो. प्रोटीनसाठी चिकन आणि मासे खातो. सकाळच्या नाश्तामध्ये ३ एग व्हाईट, १ होल एग, १ होल व्हीट टोस्ट, १ ग्लास ज्यूस, प्रोटीन शेक घेतो. दुपारच्या जेवणात १५० ग्रॅम चिकन, ५० ग्रॅम बीन्स, ५० ग्रॅम ब्रोकली खातो.

व्यायामाने स्वत:ला ठेवतो फिट

फरहान फिट राहण्यासाठी रोज २२ किलोमीटर सायकल (Cycling) चालवतो. एका आठवड्यातील तीन दिवस व्हॉलीबॉल खेळणं पसंत करतो. त्याचं म्हणणं आहे की, असे केल्यामुळे स्‍ट्रेस (Stress) दूर ठेवण्यासाठी मदत होते. 'भाग मिल्‍खा भाग,' 'जिंदगी न मिलेगी दोबारा' यासारख्या चित्रपटानंतर तूफान चित्रपटातील त्याची मेहनत पाहून फॅन्स त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news