रायगड : बोरघाटात सुदैवाने बस झाडाला अडकली; ६४ विद्यार्थी थोडक्यात बचावले | पुढारी

रायगड : बोरघाटात सुदैवाने बस झाडाला अडकली; ६४ विद्यार्थी थोडक्यात बचावले

खोपोली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरून डोंबिवली येथील विद्यार्थ्यांची सहल कार्ला देवीच्या दर्शनाला गेली असता, दर्शन करून परतीचा प्रवासात खोपोली जवळ बोरघाटातून शिंगरोबा देवस्थानच्या विरुद्ध दिशेने उतरणीवरून खाली येत असताना अचानक बसचे ब्रेक निकामे झाल्याने बस दरीच्या दिशेने गेली. मात्र सुदैवाने येथील लोखंडी रेलिंग आणि झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून बस मधील ६४ विद्यार्थी व ६ शिक्षक बालबाल बचावले आहेत. अपघातानंतर मदत कार्यकरीत सर्वाना सुखरूप गगनगिरी आश्रमात आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

डोबिवली शहरातील कोपर भागातील बामा म्हात्रे विद्यामंदीर शाळेची तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सहल बस (एमएच ०८ एचवाय ३५७१) मधून कार्ला देवीच्या दर्शनाला गेली होती. या बस ६ शिक्षक व ६४ विद्यार्थी एकविरा येथून दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस दरीच्या दिशेने जात असताना येथील लोखंडी रेलिंग व झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. बसमधील सर्वांना दुसऱ्या बसमधून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप आणण्यात आले आहे.

खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखेच्या पोनि गौरी मोरे, बोरघाट पोलीस यंत्रणेचे पीएसआय योगेश भोसले आणि महेश चव्हाण, आयआरबीचे सेफ्टी ऑफिसर आर. बी. शिंदे आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी तातडीने उपायोजना राबवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Back to top button