मुलांना संपविण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष गजाआड | पुढारी

मुलांना संपविण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष गजाआड

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहरात विवाहित महिलेला सुरूवातीला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर मुलांना संपविण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केला. दरम्‍यान, ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पोटात लाथ मारून गर्भपात केला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष जयकिशन उदकराम कांबळे (वय 31) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या‍ माहितीनुसार, 28 वर्षीय विवाहित महिला पती आणि दोन मुलांसह संघर्षनगर परिसरात राहत होती. आरोपी जयकिशन कांबळे याच्याशी ओळख झाल्यावर त्याने विवाहितेला आपला नंबर दिला आणि हळूहळू तिच्याभोवती प्रेमाचे जाळे पसरले. वेगवेगळी कारणे काढून तो तिला सतत फोन करू लागला. एक दिवस थेट घरी जाऊन त्याने ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तर तो तेवढ्यावरच थांबला नाही. विवाहितेला पतीपासून वेगळे करण्यासाठी आरोपीने तिच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यानंतर पतीने विवाहितेला घरातून हाकलले. ती दोन्ही मुलांसह माहेरी राहू लागली. तेथे जाऊन आरोपीने ‘तुझ्यासोबत लग्न करतो, तुला घर बांधून देतो, तुझ्या लेकरांचाही सांभाळ करतो,’ अशी आमिषे दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केले.

संशय घेऊन केली मारहाण 

विवाहित महिला आरोपीच्या सांगण्यावरून वेगळी खोली करून राहत होती. काही दिवस झाल्यावर जयकिशनने तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. ती गर्भवती असल्याचे समजल्यावर त्याने तिच्या पोटात लाथ मारून गर्भपात केला. तिला दवाखान्यातही नेले नाही. तो विवाहितेसह तिच्या मुलांनाही मारहाण केली. एप्रिल 2022 मध्ये जयकिशन आजारी पडला. तेव्हा विवाहितेने सोने गहाण ठेवून त्याला पैसे दिले. त्‍यांनतरही आरोपी तिला मारहाण करत होता. 27 नोव्हेंबरला रात्री त्याने दुसऱ्याच एका महिलेसोबत असल्याचे व्हिडिओ कॉल करून दाखवले. त्यानंतर या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकाणाचा तपास पोलीस करत आहेत.

हेही  वाचा

नाशिक : ७० वर्षीय वृद्धाने केला गतीमंद मुलीचा विनयभंग

चंद्रपूर : बल्लारपूरच्या ‘त्या’ घटनेत मृत्यू झालेल्या निलिमाचे मरणोत्तर नेत्रदान

Shraddha Walkar murder case | श्रद्धाची अंगठी सापडली, हत्येनंतर आफताबने गिफ्ट केली होती दुसऱ्या गर्लफ्रेंडला!

Back to top button