नाशिक : ७० वर्षीय वृद्धाने केला गतीमंद मुलीचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गतीमंद मुलीच्या असहायतेचा फायदा घेत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील बीडी कामगार नगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित मधुकर महादू सुर्यवंशी (७०, रा. बीडी कामगार नगर) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.
संशयित मधुकर सुर्यवंशी याने रविवारी (दि.२७) सायंकाळी पीडितेचा विनयभंग करीत तिच्यावर हल्ला केला. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- बिग बॉस मराठी -4 : अपूर्वा झाली भावूक
- कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ
- सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी ५४ अर्ज