पुणे : पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती करणार्या रिक्षाचालकास वाकड पोलिसांनी अटक केली. विकास सतीश गायकवाड (वय 30) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पीडितेच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
1 डिसेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला. गायकवाड हा रिक्षा ड्रायव्हर असून, तो विवाहित आहे. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला 8 महिन्यांची गरोदर केले आहे. सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले.