पिंपरी : कोरोनाने ज्येष्ठाचा मृत्यू

पिंपरी : कोरोनाने ज्येष्ठाचा मृत्यू
Published on
Updated on

पिंपरी : कोरोनाने 69 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला बुधवारी उपचारासाठी आकुर्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

ते व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांना दम्याचा त्रास होता. ते मूळ कोपरगाव येथील असून रहाटणी येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आले होते. शहरात आज दिवसभरात कोरोनाचे 86 बाधित रुग्ण आढळले. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 22 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 808 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. आज दिवसभरात 145 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 1283 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news