पिंपरी : अल्पवयीन मुलावार कोयत्याने वार, गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : अल्पवयीन मुलावार कोयत्याने वार, गुन्हा दाखल

पिंपरी : मी बालाजीनगरचा भाई आहे, असे म्हणत एकाने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 27) दुपारी बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली. आदित्य बंडू फरताडे (17, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फारुख उर्फ फर्‍या सत्तार शेख (24, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हातात कोयता घेऊन मी बालाजीनगरचा भाई आहे, आता मी तुला मारूनच टाकतो, असे म्हणून फिर्यादी मुलावर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीच्या दहशतीमुळे परिसरातील लोकांनी घाबरून घराचे दरवाजे बंद केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button