काजोलची वेबसीरिज लवकरच | पुढारी

काजोलची वेबसीरिज लवकरच

अभिनेत्री काजोल लवकरच ओटोटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारचा हा एक नवा प्रोजेक्ट आहे. खरे तर यापूर्वी सुश्मिता सेन हिची ‘आर्या’ ही वेबसीरिज सुरुवातीला काजोललाच ऑफर झाली होती. पण तेव्हा काही कारणास्तवन तिने त्या ऑफरला नकार दिला होता.

आता मात्र या नव्या वेबसीरिजबाबत काजोल खूप उत्साही आहे. नव्या गोष्टी मला एक्सप्लोर करणे आवडते. मी डिजिटल सीरिजची मोठी चाहती आहे. कारण त्यांच्या कल्पना इंटरेस्टिंग असतात. ‘आर्या’ आणि ‘रूद्र’ या सीरिज मला खूप आवडल्या. असे आव्हानात्मक काम करणे मला आवडते, असे काजोल म्हणाली. दरम्यान, काजोल अखेरची ‘त्रिभंग’ या चित्रपटात दिसली होती. आगामी काळात ती ‘सलाम वेंकी’ चित्रपटात दिसणार आहे. शिवाय ऑस्कर कमिटीवर येण्यासाठीही तिला आमंत्रण दिले गेले आहे.

Back to top button