ठाणे : कसार्‍यात एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमाकात्मक फोटोचे दहन | पुढारी

ठाणे : कसार्‍यात एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमाकात्मक फोटोचे दहन

कसारा : पुढारी वृत्तसेवा
शहापूर तालुक्यातील आक्रमक शाखा म्हणजे कसारा शिवसेना शाखा आज सकाळी 10 वाजता कसारा येथील शिवसैनिकांनी आक्रमक होत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत रॅली काढली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिंदे यांच्या प्रतिमेचा दहन करित जोरदार घोषणाबाजी करीत श्रद्धांजली वाहिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. स्वपक्षीय आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळले याचा निषेध म्हणून शहापूर तालुक्यातील कसार्‍यातील शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. यावेळी शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आले. या रॅलीचे व आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ शिवसैनिक व शिवसेना शहापूर तालुका समन्वयक चंद्रकांत जाधव, यांनी केले या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य मंजूषा जाधव, उपतालुका प्रमुख राजेश सांगळे, युवा सेनेचे निलेश निचिते, अल्पसंख्याक सेलचे मन्ना सारंग या प्रमुख पदाधिकार्‍यांसह शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सैनिक उपस्थित होते.

Back to top button