पिंपरी : प्रारूप मतदार यादीबाबत हरकती कायम | पुढारी

पिंपरी : प्रारूप मतदार यादीबाबत हरकती कायम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी संदर्भात हरकतींची संख्या वाढतच आहे. गुरूवारी (दि.30) दिवसभरात 500 पेक्षा अधिक हरकती नोंदविल्या गेल्या. महापालिकेने 1 ते 46 प्रभागाची प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि.23) प्रसिद्ध केली. या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांसह, इच्छुक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक करीत आहेत.

त्यानुसार हरकतींची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यात वैयक्तिक अर्जार्ंपेक्षा माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यांनी हरकतींच्या अर्जाचे गठ्ठे सादर केले. राज्य निवडणूक आयोगाने 2 दिवसांची मुदतवाढ दिल्याने रविवार (दि.3) पर्यंत हरकतीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, प्रारूप मतदार यादी अनेकांनी विकत घेतली आहे.

Back to top button