राजगुरुनगर : जमिनीच्या पैशांवरून युवकाचा खून | पुढारी

राजगुरुनगर : जमिनीच्या पैशांवरून युवकाचा खून

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा:  राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या आईच्या हिश्श्याचे शेतजमिनीचे पैसे मागत असल्याच्या कारणावरून 25 वर्षीय युवकाचा दगडाने व स्टील रॉडने मारून खून झाल्याची घटना निमगाव (ता. खेड) येथे घडली.

अशोक बाळू भालेराव (रा. कवळा ठाकरवाडी, निमगाव, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून दत्ता बाळू भालेराव यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शांताराम दगडू शिंदे, विशाल शांताराम शिंदे, सुनील शांताराम शिंदे व सुभाष काळे (रा. रेटवडी, ता. खेड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहे

Back to top button