पुणे : प्रभाग आरक्षणावर 25 हरकती-सूचना | पुढारी

पुणे : प्रभाग आरक्षणावर 25 हरकती-सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या महिला आरक्षण सोडतीवर अखेरच्या दिवशी एकूण 25 हरकती-सूचना आल्या असून, त्यात 11 दुबार आहेत. या हरकतींवर अंतिम सुनावणी होऊन येत्या 13 जूनला राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिध्द  होणार आहे.

महापालिकेच्या 58 प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गाची आरक्षण सोडत 31 मे रोजी जाहीर झाली. या आरक्षण सोडतीवर हरकती-सूचना नोंदविण्याची 6 जून अखेरची मुदत होती. त्यानुसार जवळपास 25 हरकती दाखल झाल्याचे पालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने गत टर्मला आमच्या भागात अनुसूचित जातीचे आरक्षण होते, ते आता का नाही, अशा स्वरूपाच्या हरकतींपासून अगदी बदललेल्या प्रभागरचनांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. या सर्व हरकतींवर आता सुनावणी होणार असून, 13 जूनला अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे.

Back to top button