‘कोल्हापूर उत्तर’ची रणधुमाळी सुरू | पुढारी

‘कोल्हापूर उत्तर’ची रणधुमाळी सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपने शक्तिप्रदर्शन करीत, तर महाविकास आघाडीने साधेपणाने आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

बुधवारी एकूण सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह साधेपणाने आपला अर्ज दाखल केला. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्याने शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी दसरा चौकातून शक्तिप्रदर्शन करीत मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Back to top button