जांबोटी : बेटणेतील ‘त्या’ घटनेचा तपास कुठपर्यंत? गाव परिसरात उलट-सुलट चर्चा

जांबोटी : बेटणेतील ‘त्या’ घटनेचा  तपास कुठपर्यंत?  गाव परिसरात उलट-सुलट चर्चा

जांबोटी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्याच्या 29 तारखेला चोर्ला मार्गालगत बेटणे जंगल हद्दीत एक अनोळखी मृत्तदेह पोलिसांना सापडला आहे. तो त्या बेटणेतील बेपत्ता महिलेचा की, बाहेरील हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांचा तपास सुरु असला तरी बेटणे गाव व परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा, अन्यथा जांबोटी-कणकुंबी भागात गुन्हेगारी वाढण्याची भीती स्थानिकातून व्यक्त होत आहे. हे प्रकरण बेपत्ता महिलेभोवतीच फिरत असून जांबोटी भागात एकच चर्चा आहे. याचा पोलिसांनाही सुगावा लागल्याने एकाला पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. मात्र मृतदेह पुरुष की महिलेचा याची खात्री झाली नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. पोलिस उपअधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार तपास जोरात सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news