औरंगाबाद : गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

औरंगाबाद : गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, त्यांचे काही विद्यमान नगरसेवक यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव हे गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या पक्षांमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळ्यातनंतर या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. या सोहळ्यात माजी नगराध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव, नगरसेवक सुरेश लक्ष्मणराव नेमाडे, ज्ञानेश्वर मुरलीधर साबणे, योगेश पाटील, अशोक कचरू खाजेकर, माजी नगरसेवक मोहसीन चाऊस, सचिन भवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संजय जाधव याच्यासोबत समाजसेवक अमोल जगताप, राकेश कळसकर, गुलाम शहा, हासीफ हनीफ बागवान, सय्यद अख्तर, इद्दू खान, सोपान देशमुख मार्केट कमिटी माजी सदस्य सतीश भडके, अविनाश पोपट सोनवणे, कैलास शेंगुळे, राजेंद्र दंडे, अण्णासाहेब पाठे, प्रवीण बाराहाते, रविंद्र सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य सारंधर जाधव, माजी युवक काँग्रेस ता. अध्यक्ष उमेश बारहाते, सोहम शमशू खान, सलीम मासूम पटेल, बाबू मनियार आदींनी राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रवेश केला.

यामुळे गंगापूर तालुक्यामध्ये आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news